Headlines

जात-धर्म विसरून तब्बल ३ हजार जणांनी एकत्र घेतला बाप्पाचा निरोप:एमआयडीसीत‎कामगारांचा अनोखा‎सोहळा‎




एमआयडीसी परिसरातील एका प्रमुख कारखान्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बाप्पाच्या गणेशोत्सवाची शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) अत्यंत भक्तीमय आणि ढोल-ताशांच्या गजरात सांगता झाली. एका बाजूला ढोल-ताशांचा दणदणाट आणि गुलालाची उधळण सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला सर्वधर्मसमभावाचे आणि मानवी बंधुभावाचे एक सुंदर चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने आयोजित या पाच दिवसांच्या उत्सवात सत्यनारायण महापूजेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेली ही मिरवणूक विळद घाट येथील तलावावर पोहोचली, जिथे विधिवत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ साद घालताना अनेक कामगारांच्या डोळ्यात पाणी तरारले, तर काहींच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता. विसर्जनानंतर आयोजित पारंपरिक महाप्रसादाचा सुमारे ३ हजार कामगारांनी कुटुंबासारखे एकत्र येऊन लाभ घेतला. सर्व भेदाभेद विसरून कामगारांनी घडवलेले हे एकजुटीचे दर्शन परिसराची शान वाढवून गेले. भेद न बाळगता सर्वधर्मीय कामगारांचा सहभाग या संपूर्ण सोहळ्यात सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे, कारखान्यातील सर्वधर्मीय कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग! कोणत्याही जाती-धर्माचा भेद न बाळगता सर्व कामगार आणि महिला वर्गाने एकत्र येऊन गणरायाच्या जयघोषात ठेका धरला. कामगारांच्या या एकजुटीने आणि सलोख्याने उपस्थितांचे मन जिंकले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *