Headlines

शाळकरी मुली बनल्या 'रिपोर्टर':छत्रीचा माईक करून रस्त्यावरील खड्ड्यांची केली पोलखोल, व्हिडिओ व्हायरल




कर्जत तालुक्यातील खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत-कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मुलींनी पत्रकारितेची अनोखी शैली अवलंबली. हातातील छत्रीचा माईक म्हणून वापर करत त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवर केलेले ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. रस्त्याच्या समस्येवर थेट आवाज कर्जत-कोंदिवडे मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच समस्येला वाचा फोडण्यासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींनी एखाद्या वृत्तवाहिनीप्रमाणे घटनास्थळावरून रिपोर्टिंग केले. एका विद्यार्थिनीने रिपोर्टरची, तर दुसरीने कॅमेरामनची भूमिका साकारत रस्त्याची विदारक अवस्था आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी दाखवून दिल्या. ‘वन-टू-वन’मधून प्रशासनाला सवाल या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनींनी एकमेकींच्या प्रतिक्रिया घेत ‘वन-टू-वन’ संवादाच्या माध्यमातून रस्त्याची समस्या मांडली. खड्ड्यांमुळे होणारे हाल, सुरक्षिततेचा प्रश्न आणि तातडीने दुरुस्तीची गरज यावर त्यांनी थेट भाष्य केले. या अनोख्या सादरीकरणामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. चिमुकल्या मुलींच्या रिपोर्टिंगचे रोहित पवारांकडून कौतुक रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावातील शाळकरी विद्यार्थिनींनी रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न अनोख्या पद्धतीने मांडत केलेल्या ‘रिपोर्टिंग’चा व्हिडिओ चर्चेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही त्याची दखल घेतली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, “रायगडमधील कोंदिवडे गावातील या विद्यार्थीनींसारखं आपण प्रत्येकानेच ‘जागल्या’ची भूमिका पार पाडली तर सिस्टिमला वठणीवर आणण्यास नक्कीच वेळ लागणार नाही,” असे म्हणत विद्यार्थिनींच्या जागरूकतेचे कौतुक केले. हेही वाचा.. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ: अवघ्या 7 तासांत तब्बल 130 जणांना घेतला चावा; रेल्वेस्टेशन परिसरातही प्रवाशांवर हल्ले, अनेक जखमी कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने रविवारी नागरिकांवर हल्ला करत तब्बल 130 हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जाणारे नागरिक, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक यांनाही या कुत्र्याने लक्ष्य केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, महापालिका आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित कुत्र्याला अखेर पकडले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *