Headlines

शिर्डीत अत्याधुनिक तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण:भारत लवकरच जगातील मोठा संरक्षण निर्यातदार देश बनणार- राजनाथ सिंह




देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडून जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असून, भारत लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश बनेल, असा ठाम विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या ‘निबे समूहा’च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणांमुळे संरक्षण उत्पादनात खासगी उद्योगांचा वाटा आता २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय उद्योग आता केवळ देशाच्या गरजा पूर्ण करत नाहीत, तर जागतिक निर्यातीसाठीही सज्ज झाले आहेत. शिर्डीतील या नव्या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर संरक्षण उत्पादनाची एक भक्कम इकोसिस्टीम निर्माण होईल. सलग वर्षभराच्या युद्धासाठी दारूगोळा; राज्यात ४ ‘डिफेन्स कॉरिडॉर’ ः मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामध्ये ५,००० कोटींची गुंतवणूक केली असून, यामुळे ४,००० पेक्षा जास्त स्थानिक तरुणांना थेट रोजगार मिळणार असल्याचे ते म्हणाले. “सीमेवर ३६० दिवस सलग युद्धासाठी पुरेल एवढा दारूगोळा बनवण्याची क्षमता आहे,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर या ४ जिल्ह्यांमध्ये ‘डिफेन्स कॉरिडॉर’ उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन, सी प्लेन्सची निर्मिती व आंतरराष्ट्रीय करार देशाकडे सध्या ७० ते ४००-५०० किमीपर्यंत मारा करणारी अस्त्रे आहेत. मात्र, १५० ते ३०० किमी अंतराचा टप्पा गाठणाऱ्या अस्त्रांची कमतरता होती. आता ती अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे याच उत्पादन प्रकल्पातून तयार केली जाईल. ‘सी-प्लेन’ निर्मिती: पाण्यातून उड्डाण करणाऱ्या आणि पाण्यातच उतरणाऱ्या लोकप्रिय ‘सी-प्लेन’ निर्मितीसाठी कॅनडास्थित ‘दी हॅवीलँन्ड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा’ आणि इस्रायलसोबत महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. या सी-प्लेनची निर्मिती याच प्रकल्पात होणार आहे. सॅटेलाइट आणि तंत्रज्ञान: ऑप्टिकल सॅटेलाइट सेवांसाठी ‘ब्लँककाय’ कंपनीसोबत भागीदारी, तर ‘ईलबीट सिस्टीम’ या जागतिक संरक्षण तंत्रज्ञान कंपनीलाही आशयपत्र सुपूर्द करण्यात आले. १००% निर्यात: हा प्रकल्प ‘स्टेट ऑफ आर्ट’ मशिनरीने सज्ज असून, यात प्रत्येकी अर्धा किमी लांबीचे ९ भव्य शेड्स उभारले आहेत. येथील १००% उत्पादने परदेशात निर्यातही केली जाणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *