![]()
शासनाच्या ‘मातोश्री ग्राम समृद्ध रस्ता’ योजनेअंतर्गत मंजूर झालेला राळेगणसिद्धी–नारायणग व्हाण शिवरस्ता तातडीने खुला करून देण्याच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील वयोवृद्ध शेतकरी भाऊ भागचंद गाजरे यांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार
.
उपोषणादरम्यान नायब तहसीलदार कारखिले यांनी गाजरे यांची भेट घेतली. संबंधित रस्ता खुला असून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी रस्त्याचे मजबुतीकरण आवश्यक असल्याचे सांगत संबंधित यंत्रणेला कामाचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या स्वाक्षरीचे आश्वासनपत्र गाजरे यांना देत उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होऊन मार्ग पूर्णपणे खुला होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा निर्धार गाजरे यांनी व्यक्त केला.
गाजरे म्हणाले, ‘मातोश्री ग्राम समृद्ध’ योजनेतून राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण हा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र भूमिअभिलेख विभागाकडून मोजमाप व हद्द निश्चिती न झाल्याने काही व्यक्ती वारंवार रस्ता अडवत आहेत. याबाबत तहसील प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही दाद मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचता यावे, दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे राहावेत, या उद्देशाने शासनाने ‘मातोश्री ग्राम समृद्ध योजना’ सुरू केली आहे. मात्र, स्थानिक स्तरावर काहींकडून रस्ते अडवले जात असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत असल्याचे गाजरे यांनी सांगितले.
महसूलच्या मानसिकतेमुळे वृद्ध शेतकऱ्यावर उपोषणाची वेळ ^ राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण हा मंजूर असलेला शिवपानंद रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी भाऊ गाजरे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत.मात्र कामे प्रलंबित ठेवण्याच्या महसूल प्रशासनाच्या मानसिकतेमुळे गाजरे यांच्यासारख्या वयोवृद्ध शेतकऱ्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली.अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कोणाला तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर उपोषणास बसण्याची वेळ येणार असेल ते महसूल प्रशासनाच्या दृष्टीने भूषणावह नाही. शरद पवळे, प्रणेते, शिवपानंद – शेतरस्ते चळवळ.