Headlines

शेळके सदनच्या जुन्या इमारतीची भिंत कोसळली:इगतपुरीतील पहाटेची घटना; दुर्घटना टळली‎




शहरातील नगर परिषद रोडवरील शेळके सदन या जुन्या व जीर्ण इमारतीची मागील बाजूची भिंत रविवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. घटना पहाटे घडल्याने तसेच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने परिसरात रहदारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भिंत रस्त्यालगत कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, संबंधित इमारतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ मलबा हटविण्यात आल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान, धोकादायक असल्याने या इमारतीबाबत नगर परिषदेकडून संबंधित मालकाला यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुमजली इमारतीच्या उर्वरित भागामुळे आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित मालकाला सोमवारी नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *