![]()
शहरातील मुख्य वैद्यकीय केंद्र असलेल्या रामदास पेठ भागातील ‘सिटी हॉस्पिटल’ला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे रुग्णालयात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेच्या वेळी रुग्णालयात सुमारे १५ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल १ वाजून ३२ मिनिटांनी घटनास्थळी रवाना झाले व पावणेतीनच्या सुमारास परतले. अग्निशमन दलाने सुमारे सव्वा तासात आग विझवली व रुग्णांना रेस्क्यू केले, असे अग्निशमन दलाने सांगितले. अग्निशमन जवान आणि स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होती, त्यांना तातडीने शेजारील ‘दयाशांती हॉस्पिटल’ मध्ये हलवण्यात आले. ^शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर धूर कोंडल्याने रुग्ण घाबरले होते. आम्ही तत्काळ प्रोटोकॉलनुसार सर्व १५ रुग्णांना दयाशांती रुग्णालयात शिफ्ट केले. सध्या सर्व रुग्ण सुरक्षित असून परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. – डॉ. प्रशांत बिबेकर, संचालक, सिटी हॉस्पिटल. रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर; उपाययोजना कागदावरच या घटनेमुळे अकोल्यातील हॉस्पिटल्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. ‘नॅशनल बिल्डिंग कोड’ नुसार प्रत्येक व्यावसायिक रुग्णालयात स्मोक डिटेक्टर्स, स्प्रिंकलर्स आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग असणे बंधनकारक आहे. रामदास पेठ हा भाग गजबजलेला असून येथील अनेक रुग्णालयांचे रस्ते अरुंद आहेत. सुदैवाने आग दुपारी लागल्याने मदतकार्य वेगाने झाले, मात्र रात्रीच्या वेळी अशी घटना घडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ केवळ कागदावरच असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सर्व रुग्ण सुरक्षित
Source link
शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना:‘सिटी हॉस्पिटल'ला आग; 15 रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलवले, रामदासपेठ भागातील घटना