![]()
श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच सुरू झालेल्या दर्शनाच्या ओघाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने आणि ‘जय भद्रा, भद्रा हनुमान की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारुती रायाची केलेली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांत तब्बल चार लाख भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त भद्रा मारुतीला राष्ट्रध्वजाची भव्य सजावट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भद्रा मारुतीच्या मूर्तीला तिरंग्याच्या रंगांमधील फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती. मूर्तीच्या वरच्या भागात भगव्या रंगाची झेंडूची फुले, मध्य भागात बिजलीची पांढरी फुले व अशोक चक्र, तर खालच्या भागात हिरव्या रंगाच्या बेलपत्रांची पाने सजवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर येथील बाळू खाडे, माणिक शिंदे, भूषण सोनवणे, कमलेश कस्तुरे, अभिजित मिसाळ व पुरवार यांनी ही सुंदर पुष्पसजावट साकारली. महाआरती आणि दर्शन व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना पहाटे ४ वाजेच्या सुमारास भद्रा मारुती संस्थान मित्रमंडळाच्या वतीने गुरूंच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, उपाध्यक्ष व भद्रा मारुती संस्था सदस्य तसेच जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे उपस्थित होते.
Source link
श्रावणाच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद दुमदुमले:4 लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन