![]()
पातूर दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेला सुटी लागल्यानंतर पातूर येथील श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमात बाल सुसंस्कार शिबिराचे १० ते २४ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन आश्रमाचे विश्वस्त मंडळ व गुरुदेवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यापूर्वी शिबिराची मुहूर्तमेढ स्वर्गीय गुरुवर्य रामरावजी तीमांडे महाराज व आश्रमाच्या संस्थापक संचालिका स्व. लीलाबाई उगले यांनी रोवली होती. त्यांच्या पश्चात आश्रमाचे विश्वस्त मंडळ तथा गुरुदेवप्रेमी यांच्या कडून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या नाश्ता, भोजन, निद्रा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हापासून संरक्षणासाठीही सोय करण्यात आली आहे. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आश्रमाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, शालिनी पाटील, नंदाबाई इंगळे, कल्याणी पाटील, प्रार्थना अटायकर, नर्मदा गाडगे, वर्षाताई अटायकर, रमेश कोथळकर, अरविंद भाजीपाले, रुपाली येनकर, मालाताई भाजीपाले, वंदनाताई देवकर, दिलीप खाकरे, आदित्य अटायकर, अर्चना उमाळे, योगिता उमाळे, शोभाताई कोथळकर, महेंद्र ढोणे, शिवाजी कुकडकर, जयवंत पुरुषोत्तम, मनोज इंगळे, प्रा. विलास राऊत, संजय राऊत, विष्णू बापू गिरे, शरद निखाडे आदींसह गावकरी, गुरुदेवप्रेमी परिश्रम घेत आहेत. या शिबिरातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडत आहेत. त्यांच्या जीवनाला शिस्त लागण्यात या शिबिराचे मोठे योगदान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे चांगला नागरिक, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यास यामुळे मदत होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासह विविध कलांचे प्रशिक्षण मिळत आहे. योग व ध्यानाचे धडेही देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना योग व ध्यान करण्याची शास्त्रीय पद्धत अवगत होत आहे. बाल सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना तबला वादनाचे धडे देण्यात येत आहे. हे शिबिर १० ते २४ मे दरम्यान घेण्यात येत आहे. दररोज सकाळी ध्यान, त्यानंतर योगासन, बौद्धिक वर्ग, तबला, गायन व हार्मोनियम वर्ग आणि टाळ व खंजेरी वर्ग घेण्यात येत आहे. तसेच सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर राष्ट्रवंदना आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. सदर शिबिर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी संचालित आजीवन प्रचारक आय. आर. शेख गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
Source link
श्री गुरुदेव सेवाश्रमात सुसंस्कार शिबिरास प्रारंभ:10 ते 24 तारखेदरम्यान दररोज तबला, खंजेरी वादनासह गायन व योगासनाचे धडे