Headlines

श्री संत गजानन महाराज पालखीचे 1 जुलैला मराठवाड्यात आगमन:700 वारकऱ्यांचा असेल सहभाग, स्वागतासाठी आतापासूनच नियोजन




‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पायदळ दिंडीचे १ जुलै रोजी मराठवाड्यात आगमन होत आहे. सुमारे ७०० वारकरी या दिंडीत अत्यंत शिस्तबद्धरीतीने सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा येत्या १ जुलै २०२६ रोजी सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव येथे पोहोचेल. येथे श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर पालखी पुढील मुक्कामासाठी सेनगावकडे रवाना होईल. श्रीक्षेत्र शेगाव येथून ता २१ जून रोजी पालखी निघणार आहे . पालखीचा २१ जून रोजी पारस येथे मुक्काम असेल, त्यानंतर २२ जून भौरद, २३ व २४ जून: अकोला (दोन दिवस), २५ जून वाडेगाव,२६ जून पातूर,२७ जून, श्री क्षेत्र डहा,२८ जून: शिरपूर जैन, २९ जून म्हसला पेन, ३० जून रोजी रिसोड येथे मुक्काम असणार आहे. पालखी सोहळ्याचे मराठवाड्यात सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव येथे ता एक जुलै रोजी आगमन होणार आहे. त्यानंतर रात्री सेनगाव येथे मुक्काम असेल. त्यानंतर २ जुलै डिग्रस कऱ्हाळे, ३ जुलै जवळा बाजार, ४ जुलै श्री क्षेत्र त्रिधारा, ५ जुलै परभणी, ६ जुलै दैठणा, ७ जुलै गंगाखेड, ८ जुलै परळी ( थर्मल ), ९ जुलै परळी वैजनाथ, १० जुलै अंबाजोगाई, ११ जुलै बोरी सावरगाव, १२ जुलै कळंब,१३ जुलै तेरणा सा. कारखाना, १४ जुलै उपाळा (माकडाचे), १५ जुलै धाराशिव, १६ जुलै श्री क्षेत्र तुळजापूर, १७ जुलै ऊळे, १८ व १९ जुलै सोलापूर (दोन दिवस), २० जुलै तिरहे, २१ जुलै माचणूर, २२ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा, २३ ते २८ जुलै: श्री क्षेत्र पंढरपूर (येथे २३ जुलै रोजी आगमन होऊन सहा दिवस मुक्काम राहील. मराठवाड्यात या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भाविकांमधून मोठी उत्सुकता असून ठिकठिकाणी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पालखी सोहळ्याच्या मुक्कामाचे त्या त्या गावातील भाविकांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *