![]()
संजय राऊत हे कामशास्त्री आहेत, त्यांनी न्यायालय आणि संविधानाबद्दल बोलू नये. एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यावर ठाकरे गटाची पळता भुई थोडी होईल, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. रामशास्त्री कोण आहे हे शोधण्यापेक्षा राऊतांनी आपण कामशास्त्री कसे झालो याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. नवनाथ बन पुढे म्हणाले की, राऊतांचे महाराष्ट्र अस्थिर करण्याचे मनसुबे जनतेने पूर्णपणे हाणून पाडले आहेत. 99 जागा लढवून अवघ्या 15 जागा मिळाल्यानंतर राऊतांनी इतरांवर आरोप करण्यापेक्षा उबाठा गटाच्या राजकीय पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. तसेच, मुंबई महापालिकेच्या 25 लाखांच्या टेंडरबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, हे कंत्राट रितूताई तावडे यांच्या वैयक्तिक अकाउंटसाठी नसून महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्ससाठी आहे. प्रसारमाध्यमांतील खर्चावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी आधी आपल्या महापौरपदाच्या काळातील कंत्राटे व खर्चाचा हिशेब महाराष्ट्राला द्यावा.
देवाभाऊंच्या नेतृत्वात 2029 ची निवडणूक जिंकणार नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की मुंबईत राहणार, याची चिंता राऊतांनी करू नये. त्याऐवजी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार की समाजवादी पक्षात, याची चिंता त्यांनी करावी. कारण जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्रातच राहणार असून 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवून जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमृता फडणवीसांना सल्ले देण्याऐवजी खासदारकी वाचवा नवनाथ बन म्हणाले की, 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात बसले तेव्हा अमृता फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्याच्या पत्नीची जबाबदारी अत्यंत खंबीरपणे स्वीकारली होती. राऊतांनी 2028 मध्ये खासदारकीची टर्म संपल्यावर आपल्याला काहीच मिळणार नाही, ही मानसिकता आतापासूनच तयार करावी. त्यांनी अमृता फडणवीसांना सल्ले देण्याऐवजी आपली खासदारकी कशी वाचवता येईल, याकडे लक्ष द्यावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला. जुन्नर प्रकरणावर कडक कारवाईची मागणी जुन्नर येथे घडलेल्या अमानुष घटनेचा निषेध करत नवनाथ बन यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने करून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही केली. हे ही वृत्त वाचा
खरे बौद्धिक नक्षलवादी हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष आहेत:संजय राऊतांचा घणाघात, अमृता फडणवीसांनाही लगावला टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळण्यामागे हजारो कोटींचा व्यवहार झाला असून, यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दलाली केल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Source link