Headlines

संत भीमा भोई महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन:आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव‎




येथील भोई समाजातर्फे समाजसुधारक संत शिरोमणी श्री भीमा भोई महाराज यांच्या १७६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते संत भीमा भोई महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या विचारांवर आधारित समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित वक्त्यांनी, संत भीमा भोई महाराज यांनी दिलेला मानवता, समता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश आजच्या आधुनिक समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अमोल पाटील म्हणाले की, समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायासोबतच शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज त्याचाच प्रत्यय येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोई समाजाचे अध्यक्ष अनिल भोई, उपाध्यक्ष राजू भोई, सेक्रेटरी नरेश भोई, किरण भोई, नितिन भोई, गणेश भोई, विलास वाल्डे, मयूर भोई आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गुणवंतांचा गुणगौरव : याच कार्यक्रमाचे औचित्य साधून भोई समाजातील गुणवंतांचा आमदार पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये गौरव मोरे यांची गट विकास अधिकारी (बीडीओ) पदी निवड झाल्याबद्दल, तसेच प्रा. मयूर वाल्डे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *