Headlines

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎



विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६ वा पायी पालखी सोहळा २६

.

श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा, पंढरपूर येथे पोहोचेल. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी संस्थेच्या वतीने निवास, भोजन व आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २६ जून रोजी सकाळी ९ वाजता पालखी सोहळा प्रमुख तथा संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन दुपारी एक वाजता रथयात्रा व पायी दिंडीचे प्रस्थान होईल. सोहळ्याचे नियोजन नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत निश्चित झाले. या वारीचे मार्गक्रमण वासुदेवराव महाराज महल्ले, महादेवराव ठाकरे, अविनाश गावंडे, अनिल कोरपे, अंबादास महाराज मानकर यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.

२४ जुलैला पंढरपुरात पुण्यतिथी सोहळा : सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांनी २ जुलै २००९ रोजी पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी आपला देह अर्पण केला होता. या तिथीचे औचित्य साधून २४ जुलै रोजी पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील अग्निसंस्कार स्थळी अभिषेक, आरती, पुण्यतिथीचे कीर्तन, महाप्रसाद व रात्री दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपुरात अखंड हरिनाम सप्ताह व नोंदणी पंढरपूर येथील श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेत २२ ते २९ जुलै दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह होईल. यात नामवंत महाराजांचे कीर्तन व प्रवचन होतील. वारीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी आपले नाव, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट फोटोसह संस्थेच्या कार्यालयात त्वरित नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *