![]()
मिटमिटा परिसरात फार्महाऊसमधून मोठ्या प्रमाणात रोकड व शस्त्रांची निर्यात होणार असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सुरुवातीला काही पोलिसांची टीम कारवाईसाठी गेली होती. यातील महिलेने विरोध दर्शवत ‘बाबाजीने बोला, रूम खोलने का नहीं,’ असे सांगितल्यावर हा बंगला १९९० च्या दशकातील कथित डॉन व कामगार नेते बाबा फर्जन ऊर्फ फरदून अर्देसर दोरडी यांचा असल्याचे उघड झाले. घरात असलेले घबाड बघून गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या बंगल्यातून ५.२६ कोटी रोख, ४ रायफल्स, २ पिस्तुले, ६,३५० काडतुसे, दागिने, मद्याच्या बाटल्या आदी जप्त करण्यात आले. तब्बल २४ तास चाललेल्या या कारवाईत त्याची पत्नी शीलाबाई बाबा फर्जन दोरडी ऊर्फ शीलाबाई गणपत साळवे (४८, रा. गट क्रमांक १२६, मिटमिटा) हिला अटक केली असून ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांनी दिली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा फर्जन याचे महिनाभरापूर्वी निधन झाले. पोलिसांनी शुक्रवारी (१० जुलै) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई सुरू केली. शीलाबाई हिने पोलिस गेटमधून आत येत असताना विरोध दर्शवत सर्च वॉरंटची मागणी केली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने घरात प्रवेश दिला होता. अनुत्तरित प्रश्न : १. बाबाच्या घरात सापडलेल्या नोटानुसार अनेक वर्षांपासून ही संपत्ती आहे. त्यावर इतके वर्षे कारवाई का झाली नाही? २. मोठ्या प्रमाणात असलेला शस्त्रसाठा त्याने आजवर कोणाला पुरवला आहे का? ३. कोट्यवधींची संपत्ती त्याने कोणाकडून जमा केली. त्याचा घातपाताचा डाव होता का? ४. शहरातील घर बदलून त्याने मिटमिटा परिसरात शिफ्ट होताना देखील कोणालाही संशय कसा आला नाही? ५. त्याच्या मृत्यूनंतर कारवाई झाल्याने त्यास प्रशासनातील कोणाचे अभय होते का? कोण होता बाबा फर्जन? शहरात कामगार नेता म्हणून उदय. त्याने अनेक कंपन्यांचे संप मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. १९९० मध्ये विधानसभा लढवली. पराभूत झाला. त्याच्यावर १९८३ मध्ये हत्येचा प्रयत्न गुन्हा, १९८४ मध्ये मारहाणीचा तर २०१६ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याची १९९० च्या दशकात शहरात डॉन म्हणूनही ओळख झाली. वाटाघाटीत वाद झाल्याने ‘खबर’ बाहेर सिटी चौक परिसरात बाबा वास्तव्यास होता. एक ते दीड वर्षापूर्वी मिटमिटा परिसरात बंगल्यात तो स्थलांतरित झाला होता. या शिफ्टिंगवेळी त्याच्या सहकाऱ्यासह अनेकांना या पैशांची माहिती मिळाली. बाबाच्या मृत्यूनंतर पैसे वाटाघाटीत वाद निर्माण झाले. बाबाचे वारसदार इकडे येण्यापूर्वी त्यांना हे सर्व मिटवायचे होते. मात्र, यातील एक जण फुटल्याने फार्महाऊसमध्ये शस्त्र असल्याची माहिती पोलिसांनी समजली. २००० मधील वर्तमानपत्र अन् चिकटलेल्या रबरात होत्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा गर्द झाडी, विविध गेट्स आणि ३०-३५ सीसीटीव्ही असलेल्या बाबाच्या घरातील एका खोलीत हे घबाड होते. खोली उघडण्यासाठी पोलिसांना ५०० किल्ल्यांचा संच दिला. आत पांढऱ्या दोरीने चौकोनी बांधलेल्या ३ कोठ्या, १ कपाट व काही पोती होती. दोऱ्या कापून उघडल्यावर २०१६ पूर्वीच्या १०, २०, ५० आणि १०० च्या नोटा व शस्त्रे सापडली. २००० च्या दशकातील वृत्तपत्रांत गुंडाळलेल्या या नोटांना रबर बँड चिकटले होते. ५ मोजणी मशीनद्वारे नोटा मोजण्यास १४ तास लागले. सापडलेल्या शस्त्रांपैकी ४ शस्त्रांचे परवाने २०२८ पर्यंत नूतनीकरण केलेले आहेत. पत्नी म्हणाली, ‘बाबाजीने बोला, रूम खोलने की नहीं’, त्यातच घबाड जुन्या व चलनातून बाद झालेल्या नोटा मोठ्या प्रमाणावर सापडल्यास, ‘स्पेसिफाइड बँक नोट्स (सेसेशन ऑफ लायबिलिटीज) ॲक्ट, २०१७’ नुसार कारवाई केली जाते. या कायद्यांतर्गत जुन्या नोटा बाळगणे हा दंडनीय अपराध असून, जप्त केलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे थेट नष्ट करण्यासाठी पाठवली जाते.
Source link
संभाजीनगरात दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा:5.26 कोटी रोख, 4 रायफल्स, 2 पिस्तुले, 6,350 काडतुसे, दागिने असे मोठे घबाड हाती