![]()
विक्री केलेला आणि ताब्यात असलेला प्लॉट २०२१ मध्ये मुलाच्या नावे नोंदणीकृत खरेदीखत करून दिल्यानंतर त्याच प्लॉटची २०२३ मध्ये दुसऱ्याच्या नावे पुन्हा नोंदणी करुन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १८ ऑगस्ट २०२१ ते १७ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. तुळसाबाई पांडुरंग प्रधान (तक्षशिलानगर, मोंढा), विजय कीर्तिकर (संसारनगर, क्रांती चौक), गणेश परदेशी ( छावणी) आणि राजू पांडुरंग प्रधान (रा. तक्षशिलानगर, मोंढा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पौर्णिमा हिवराळे (४८, रा. हायकोर्ट कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांनी क्रांती चौक परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था सुरू केली होती. फिर्यादीच्या आई-वडिलांनी त्यांच्या ओळखीची महिला तुळसाबाई प्रधान हिच्याकडून १३ जुलै २००४ रोजी तेथील प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यावेळी एक लाख रुपयांचा व्यवहार ठरून प्लॉटचा ताबाही दिला २०१५ मध्ये त्यांनी प्लॉटसाठी १० लाख रुपये मागितले. त्यानंतर उर्वरित रक्कमही वेळोवेळी रोख देण्यात आली आहे. खरेदीखत २०२१ मध्ये, मात्र नाव दुसऱ्याचे सर्व व्यवहारानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी संबंधित प्लॉटचे नोंदणीकृत खरेदीखत करण्यात आले. हिवराळे यांनी हे खरेदीखत आपला मुलगा मिथिलेश सुरेश जोगदंडे यांच्या नावे करून घेतले. मात्र, मुलगी प्रसूतीसाठी पुणे येथे गेल्याने तिच्यासोबत राहण्यासाठी पुण्याला जावे लागल्यामुळे ही प्रक्रिया राहून गेली. परतल्यानंतर मुलाच्या नावे मालमत्ता पत्रकावर नाव लावण्यासाठी कलेक्टर कार्यालयात गेल्यावर संबंधित मालमत्ता विजय कीर्तिकर याच्या नावे असल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मालमत्ता पत्रकाची प्रत घेतल्यानंतर प्रकार उघड यानंतर हिवराळे यांनी मालमत्ता पत्रकाची प्रत घेतली. त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयातून विजय कीर्तिकर यांच्या खरेदीखताची प्रत मिळविली. त्यातून १७ जानेवारी २०२३ रोजी दस्त क्रमांक ५०४/२०२३ अन्वये त्याच प्लॉटची विजय कीर्तिकर यांच्या नावे नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्याचे समोर आले.
Source link
संभाजीनगरात विकलेला प्लॉट पुन्हा विकला; चौघांवर गुन्हा:दुसऱ्याला प्लॉट विकून 10 लाखांची फसवणूक