Headlines

नांदूरशिंगोटेत रविवारपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन:नवरात्रोत्सवात नामवंत महिला कीर्तनकारांची सेवा‎




येथील श्री रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवार (दि. ११) पासून दहा दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, मंदिरासह संकुलातील कलशांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रेणुकामाता मंदिराच्या पटांगणात कीर्तन महोत्सवासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मंदिर संकुलातील सहा मंदिरांच्या गाभाऱ्यांत आणि कलशांवर विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. गतवर्षापासून गावातील युवक व ग्रामस्थ एकत्र येऊन महिला कीर्तनकारांच्या कीर्तनांचे आयोजन करत आहेत. रविवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता रेणुकामाता मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. उत्सवकाळात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी देवीची महाआरती, रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. कीर्तन महोत्सवात रविवारी (दि. ११) ज्योती सोनवणे, (दि. १२) सविता केकाण (मुंढे), (दि. १३) वनिताताई पाटील, (दि. १४) राणीताई दौंड, (दि. १५) सुनिता आंधळे, (दि. १६) आरती शिंदे, (दि. १७) नेहाताई भोसले आणि (दि. १८) ज्योती धानोडे यांची कीर्तने होणार आहेत. सोमवारी (दि. १९) माधव महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *