Headlines

चिमुकल्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून धाडली दुष्काळ व्यथा:जागतिक टपालदिनी जेऊर शाळेतून पाठवली पत्रं‎




पावसाअभावी यंदा खरीप जळून गेले. इतर पिकांनीही माना टाकल्या. तलाव कोरडे पडले, विहिरींनी तळ गाठला. शेतकऱ्यांची स्वप्नं मातीमोल झाली. आपल्या शेतकरी बापाची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी म्हणून जागतिक टपाल दिनी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील चिमुकल्यांनी दुष्काळाची कथा अन् शेतकऱ्यांची व्यथा पत्रातून धाडली. मोबाइल आणि इंटरनेटच्या जमान्यात पत्रसंस्कृती लोप पावत असताना जेऊर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने जागतिक टपाल दिनानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला. येथील विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त भागाच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण ्यासाठी हाताने पत्र लिहिले. जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी कागदावर स्वहस्ताक्षरात ही व्यथा मुख्यंमत्र्यांपर्यंत पोहोचली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना टपाल सेवेचे महत्त्व, पत्र लिहिण्याची कला आणि विचार शासनापर्यंत कसे पोहोचवायचे याचे प्रात्यक्षिक मिळाले. विद्यार्थ्यांनी आपली व्यथाही सांगितली. उपाययोजना करण्याची पत्रातून केली मागणी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रात पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळामुळे होणारे हाल याबत सविस्तर माहिती देऊन शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. केवळ अर्ज नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची मुलांनी आपल्या घरची, गावातील स्थिती प्रत्यक्ष पाहिली, तिचेच दर्शन त्यांच्या पत्रातून घडले. त्यांनी आपली व्यथाच पत्रातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *