![]()
धुळे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलवर ७ ऑक्टोबर रोजी तरुणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये शिरून वेटर विशाल गायकवाड व व्यवस्थापक रोहित नरवडे (२१) यांच्यासह कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच साहित्याची तोडफोड करत किचनमध्ये पेट्रोल टाकून हॉटेल जाळण्याचा प्रयत्न केला. रोहित नरवडे यांच्या तक्रारीवरून कुणाल म्हस्के, शाहरूख शेख उर्फ गाठ, अजय म्हस्के, नागेश आहीरे, आदेश उर्फ लल्या नेमाणे, विठ्ठल एखंडे, शुभम मुंजाळ, बब्बू खलील पठाण (सर्व रा. पाचोड), गजानन काळे यांच्यासह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे : गुन्हेगारीविरोधात ग्रामस्थांनी पाचोड ठाण्यात ३ तास ठिय्या आंदोलन केले. निवेदनावर सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, भागवत भुमरे, सुयोग बाकलीवाल, राज धारकर, आदित्य घुले, अमित नरवडे, आबा भुमरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Source link
पाचोड येथील हॉटेलवर धुडगूस घालत पेट्रोल ओतून जाळण्याचा केला प्रयत्न:15 जणांवर गुन्हा दाखल; ग्रामस्थांचा ठाण्यामध्ये 3 तास ठिय्या