Headlines

माय-बाप सरकारने तत्काळ मदत करावी; शेतकऱ्यांची साद:नगर व कर्जत तालुक्यात केंद्राच्या पथकाचा दौरा; चारा-पाणीटंचाई दूर करण्याची शेतकऱ्यांची मागणी




जिल्ह्यातील गंभीर टंचाई स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने शुक्रवारी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची नोंद घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेली पिके पथकाला दाखवत “माय-बाप सरकारने तत्काळ मदत करावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली. “चारा-पाण्याची स्थिती गंभीर आहे. गावाची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवावा आणि शासनाकडून मदतीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र शासनाचे हे आंतरमंत्रालयीन पथक आहे. पथकप्रमुख व केंद्रीय पीक विभागाचे संचालक के. पोन्नुसामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईचा आढावा घेतला. पथकात अबसर अहमद खान (केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) आणि सुमीत शर्मा (सहायक संचालक, केंद्रीय अन्न विभाग) यांचा समावेश आहे. प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पाऊस, पाणीटंचाई, पीक नुकसान आणि चारा व्यवस्थापनाची माहिती पथकासमोर मांडली. कृषी आयुक्त सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे आदी उपस्थित होते. पथकाने चास येथे बाजरी, तूर आणि कांदा या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. विठ्ठल गवळी, पोपट गवळी, भिकाजी सहादू देवकर, अनिल देवकर आणि श्रीपती देवकर या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची स्थिती जाणून घेतली. निमगाव वाघा शिवारातील कोरड्या पडलेल्या पाझर तलावाची पाहणी करत पथकाने पाणी उपलब्धतेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील दोन आणि कर्जत तालुक्यातील चार ग्रामपंचायत हद्दींमध्ये पाहणी केली. वालवड येथे पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विहिरीची पाहणी करून भूजल पातळीची स्थिती तपासली. पुढे काय होणार… राज्यभरातील केंद्रीय पथकांच्या पाहणीची एकत्रित माहिती पुढील मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल. मदत व पुनर्वसन विभाग राज्यस्तरावर अहवाल तयार करण्याची शक्यता; त्यानंतर तो केंद्राला पाठवला जाईल. पथकाकडूनही स्वतंत्र अहवाल केंद्राला पाठवला जाईलच. तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने पुढील काही दिवसांतच केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे. कर्ज कसे भरायचे, पैसेच राहिले नाहीत ^पथकाने आमच्या वावरात येऊन पाहणी केली. इथली पाणी टंचाईची स्थिती व पिके उध्वस्त झाली आहेत. लावलेले सोयाबीन करपून गेले. पेरणीचा खर्च वाया गेलाच, उत्पन्नही नाही. त्यामुळे दुप्पट तोटा झाला. कर्ज थकलंय, भरायला पैसा नाही. आम्हाला तत्काळ मदत करा, अशी मागणी पथकाकडे केली. संदीप वाळूंज, शेतकरी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *