![]()
संरक्षण उत्पादन विभागाने देशातील संरक्षण उत्पादनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी सांगितले की, देशात १.७६ लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले असून, यात खासगी कंपन्यांचा २५ टक्के वाटा आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांवर भर दिला जात आहे. पुण्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. स्फोटक आणि प्रोपेलंट उत्पादकांसाठी नुकताच एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारमध्ये कंपन्यांना जागतिक संरक्षण उत्पादन संधींची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या सूचनाही घेण्यात आल्या. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी प्रगती करून कायमस्वरूपी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कुमार यांनी केले. संरक्षण उत्पादन विभागाचे महासंचालक एन. मनोहरन यांनी सांगितले की, संरक्षण उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने देशात प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित विविध लोकांना सहभागी करून प्रथमच राष्ट्रीय सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. यात शासनाचे अधिकारी, खासगी कंपनी उत्पादक आणि स्टार्टअप व्यावसायिक सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्फोटक उत्पादन करताना काळजी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरक्षा नियमावली तयार करण्यात आली आहे. पेसो (PESO) अथॉरिटी अंतर्गत सुरक्षा प्रमाणपत्रे दिली जात आहेत. संरक्षण विभाग खासगी कंपन्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोटकांशी संबंधित वेगवेगळ्या दुर्घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यहानी टाळण्यासाठी तंत्रज्ञान वाढवण्यावर भर दिला जात आहे. डिफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन समिती विविध दुर्घटनांचा बारकाईने अभ्यास करून आवश्यक शिफारशी करत आहे.
Source link
संरक्षण उत्पादनात खासगी कंपन्यांचा 25 टक्के वाटा:1.76 लाख कोटींच्या निर्मितीची माहिती संजीव कुमार यांनी दिली