Headlines

संशोधन करून कल्पनाशक्तीचा विकास साधावा- मानसिंग पवार:कन्नडच्या श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसीत कार्यक्रम‎




विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते व परीक्षानिष्ठ अभ्यासापुरते मर्यादित न राहता नवीन संशोधन करून आपल्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा विकास साधावा, असे प्रतिपादन उद्योजक मानसिंग पवार यांनी केले. कन्नड येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच विद्यार्थ्यांसाठी संस्थास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांचे उद्घाटन उद्योजक मानसिंग पवार यांच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि कल्पकता कशी महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास कृष्णा निकम, चंद्रकांत देशमुख, डॉ. ए. के. महाले, बाबासाहेब मोहिते, विशाल आहेर, डॉ. विजय भोसले व योगेश सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविकादरम्यान त्यांनी महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नागरिकांचा रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, रक्तगट, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, तसेच हृदयाची गती आणि नाडीचा दर इत्यादी विविध आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. आरोग्य तपासणीसोबतच उपस्थित नागरिकांना निरोगी जीवनशैली कशी जगावी, संतुलित आहाराचे महत्त्व काय आणि नियमित आरोग्य तपासणी का गरजेची आहे, याविषयी तज्ज्ञांमार्फत मोफत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. सर्जनशीलता आणि उपक्रमास प्रोत्साहन विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने संस्थास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना, प्रकल्प आणि मॉडेल्सचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *