![]()
दिंडोरी राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त व दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नितीन देशमुख, तालुकाप्रमुख अमोल कदम, नगरसेविका ज्योती देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यातील गंभीर परिस्थितीबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधले. कदम यांनी निवेदनात नमूद केले की, यंदा वेळेवर पाऊस न झाल्याने आणि पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तुटपुंज्या पावसाच्या कागदोपत्री निकषांवर आधारित तालुक्याला यादीतून वगळणे अयोग्य आहे. शेतात पिके सुकू लागली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. म्हणून तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करून शेतकऱ्यांना भरगोस मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
Source link
दिंडोरीचा दुष्काळयादीत समावेश करा:नितीन देशमुख यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन