Headlines

सभापती अनिता मोठे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा केला सत्कार:सभापती अनिता मोठे यांची निल्लोड जिल्हा परिषद शाळेला भेट‎




जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निल्लोड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी चौथीतील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानन शालेय समितीचे अध्यक्ष उमेश आहेर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे उपस्थित होत्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती भगवान पाटील आहेर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे, सरपंच उत्तम शिंदे, उपसरपंच अक्षय मगर, ग्रामपंचायत सदस्य गंगासागर आहेर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस राजेंद्र आहेर, जयश्री शिरगुरुवार, छाया निकम, रेशमा वेळे, अश्विनी जंजाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *