Headlines

‘समृद्धी’वर ओव्हर स्पीड कारला 2 तर ट्रकला 4 हजार दंड:नंतर परवाना रद्द, दोन्ही बाजूंना ‘झिगझॅग’ कॅमेरे, धुके व रात्रीही ते दिवसाप्रमाणेच प्रभावीपणे काम करतील


समृद्धी महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासाठी दर एक किलोमीटर अंतरावर डाव्या आणि उजव्या बाजूला आलटून-पालटून म्हणजेच ‘झिगझॅग’ पद्धतीने हाय-प्रोफाइल सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

.

हे कॅमेरे अतिशय उच्च क्षमतेचे असल्याने धुके किंवा रात्रीच्या वेळीही वाहनाची नंबर प्लेट, चालक आणि त्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिपू शकतील. सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनधारकांना एक हजार रुपये दंड, लेन कटिंग केल्यास ५०० तर ओव्हर स्पीड असलेल्या कारसह हलक्या वाहनांना २ हजार तर जड वाहनांसाठी ४ हजार रुपये दंड होईल. झिगझॅग पद्धतीने हे कॅमेरे बसवण्यात येत आहे. त्याचे नियंत्रण कक्ष अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, ते ठाणे किंवा नागपूर येथे असू शकते. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली नोव्हेंबर महिन्यापासून पूर्णपणे कार्यान्वित होईल.

दोनदा दंड झाल्यानंतर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

कार व हलक्या वाहनांसाठी ताशी १२० किमीची वेगमर्यादा

वाहनांचा प्रकार लक्षात घेऊन महामार्गावर कार व हलक्या वाहनांसाठी ताशी १२० किमी, बससाठी ताशी १०० किमी आणि जड वाहनांसाठी ताशी ८० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोनदा दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते.

सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात समृद्धीवर ‘एमएसआरडीसी’कडून झिगझॅग पद्धतीने सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. या महामार्गावर ताशी १२० पेक्षा अधिक वेगाने कार चालवू नये. -ऊर्मिला पवार, आरटीओ,अमरावती

महामार्गावर नियमभंग करणाऱ्या चालकांचा फोटो कॅमेऱ्यात कैद होताच थेट त्यांच्या मोबाइलवर ई-चलान पाठवले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *