Headlines

सटाण्यातून जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवा:शहरातील समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मंत्री भुसे यांचे निर्देश‎



शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीसह विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. सटाणा–मंगरूळ रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज

.

सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या बांधकामासह शहरातील समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी सटाणा नगराध्यक्ष हर्षदा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, प्रांताधिकारी महेश शेलार, मुख्याधिकारी ज्योती भगत, भूमिलेख उपअधीक्षक देवेंद्र भावसार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव संतोष शेलार व प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे यांनी दृकदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग व आवश्यक नकाशे तयार करण्यासाठी सर्व विभागांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला सहकार्य करावे. कामांसाठी आवश्यक माहिती संकलित करून पुढील १५ दिवसांत प्रस्तावांची कार्यवाही पूर्ण करावी, असे भुसे यांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर शाळा, बसथांबे आणि नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पर्यायी मार्ग आणि बायपासच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रस्तावित बायपासच्या कामांचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करून संबंधित मंत्रालयाकडे पाठवावेत, असे निर्देशही भुसे यांनी दिले.

शासकीय जागा, मालमत्तांचा योग्य वापर करून पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. शहरविकासाचा विचार करून जलवाहिणीसह विविध सेवा शक्यतो भूमिगत पद्धतीने नियोजित कराव्यात, अशी सूचना केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *