Headlines

सरकारची विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती:पैशांचे आमिष दाखवून मते घेतली, ती परत करणार का? लाडकी बहीणवरून इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल




सत्तेसाठी पैशांचे आमिष दाखवून मते मिळवायची आणि नंतर वसुलीच्या गप्पा मारायच्या, ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे.भाजपने महाराष्ट्रात केवळ सत्तेत येण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ घाईघाईने लागू केली. आता सत्तेवर आल्यानंतर योजनेतील तब्बल 90 लाख लाभार्थी अपात्र असून त्यात पुरुषांचाही समावेश असल्याचे सांगत मंत्री अतुल सावे पैसे वसूल करण्याची भाषा करत आहेत. “जर अपात्र लोकांकडून पैसे परत घेणार असाल, तर पैशांचे आमिष दाखवून जे मतदान पदरात पाडून घेतले, ते मते भाजप परत करणार आहे का? असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले की, दीपके यांच्या कुटुंबाने संजय शिरसाट यांना घरात घ्यायलाच नको होते. शिरसाट दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी का गेले नाहीत? सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारला धक्का बसला असला तरी याचा फायदा कोणत्या विरोधी पक्षाला होईलच असे नाही, कारण भाजप जातीय राजकारणाचा नवा खेळ खेळेल, असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीत सीजेपीने केलेल्या आंदोलनातून देशातील तरुणांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की आता खूप झाले, प्रत्येकाला चिल्लर समजू नका. ‘देशद्रोही’ ठरवण्याची मानसिकता इम्तियाज जलील म्हणाले की, आज देशात सरकारविरोधात कोणीही बोलले की त्याला थेट ‘आतंकवादी’, ‘देशद्रोही’ किंवा ‘परदेशातून पैसा मिळणारा’ ठरवले जाते. भाजप नेत्यांची मानसिकता अशी झाली आहे की, सरकारी यंत्रणा आपल्या हातात असल्याने आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही. याच अहंकारामुळे मोदी सरकारला जनतेच्या खऱ्या अपेक्षा काय आहेत, हे समजलेलेच नाही. शिक्षणमंत्र्यांच्या अटकेची मागणी इम्तियाज जलील म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ‘धर्मेंद्र प्रधान यांना आम्ही अटक करू’ अशी कडक भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, नेहमीप्रमाणे केवळ लहान कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून मोठ्या मंत्र्यांना पाठीशी घातले जात आहे. दिल्ली आंदोलनात पोलिसांकडून मुलींचा विनयभंग दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक मुलींचा विनयभंग झाल्याचे व्हिडिओ समोर आल्याचा दावा करत, यात सहभागी असणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जलील यांनी केली. तरुण आता जागरूक झाले असून मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार नवनवीन प्रयोग करते हे जनतेला चांगलेच समजले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *