![]()
जुन्नर तालुक्यातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपल्याच सत्तेतील पक्षाला कडक शब्दांत घरचा आहेर दिला आहे. सत्तेत असूनही सरकार जनतेचे ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? असा संतप्त सवाल करत, सत्ता कोणाची आहे यापेक्षा जनतेची मागणी अधिक महत्त्वाची असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच याप्रसंगी जुन्नरच्या रेल्वेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणीही बेनके यांनी केली आहे. नारायणगाव येथे विविध पक्षांचे नेते आणि नागरिकांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनादरम्यान, ‘जुन्नर तालुक्यात रेल्वेलाईन झालीच पाहिजे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी समन्वयाने आणि एकजुटीने पाठपुरावा करावा,’ असे स्पष्ट करत अतुल बेनके यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला. यावेळी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी, मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष सध्या सत्तेत आहे, पण सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल उपस्थित केला. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा, या मागणीसाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्गाजवळ आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा, या मागणीसाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्गाजवळ आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले; मात्र त्यानंतरही संतप्त आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या ‘जीएमआरटी’ (GMRT) दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक हा मूळ मार्ग रद्द करून नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण अशा पर्यायी मार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्यातूनच हे आंदोलन उभे राहिले आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा, या मागणीसाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्गाजवळ आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले. मात्र त्यानंतरही संतप्त आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला.
Source link
'सरकार ऐकत नसेल, तर सत्ता काय कामाची?':पुणे-नाशिक रेल्वेवरून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर, अतुल बेनके काय म्हणाले?