Headlines

सहा घरफोड्या उघड:2.19 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 2 अटकेत




डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग घडणाऱ्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका सराईत टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल असा दोन लाख १९ हजार ८३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २१ जुलै रोजी डाबकी रोड हद्दीतील लक्ष्मीनगर येथील शेतकरी विनोद सरप हे कुटुंबासह शेतात गेले असता, चोरांनी बाथरूमच्या व्हेंटिलेशन खिडकीची लोखंडी जाळी कापून घरातून सोन्याची अंगठी, रोकड व मोबाइल चोरून नेला होता. या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शोध पथकाने शेख सादीक शेख हैदर (१९), रा. संभाजी नगर व मोहम्मद रिझवान शेख इरफान (२१), रा. अकोला फैल या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *