![]()
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ‘युट्यूब’च्या माध्यमातून प्रक्षेपण बंद केल्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विरोधकांनी सभा सुरू होण्यापूर्वीच या िनर्णयाला िवरोध केला. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर ठिय्या देत प्रशासनाचा निषेध केला. विशेष म्हणजे, सभेच्या अजेंड्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव असतानाही सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावही जनतेपर्यंत जाऊ नये, अशी भूमिका का?’, असा सवाल विरोधी पक्षनेते डॉ.जिशान हुसेन यांनी उपस्थित केला. यामुळे सभा सुरू होण्यापूर्वीच महापालिका आवारात राजकीय वातावरण तापले होते. विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव, नगरसेवक पराग गवई, उद्धवसेनेचे नगरसेवक विजय इंगळे, काँग्रेसचे नगरसेवक आजाद खान यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. सभा लाइव्ह करण्याची, मागणी यावेळी करण्यात आली. याच मुद्यावरून सभा सुरु झाल्यानंतर आक्षेप घेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना िवरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेच्या अजेंड्यावर आहे. हा सत्ताधाऱ्यांचा ठराव असतानाही त्याचे थेट प्रक्षेपण का केले नाही?, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या सभेत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात असतील तर ते नागरिकांपासून लपवण्याची गरज कायॽ, असा सवालही त्यांनी केला. सभागृहात असे काय घडते की सभा लाइव्ह बंद करण्याची वेळ येते?, असे म्हणत त्यांनी निर्णयावर नाराजी व्यक्त केली. महापौरांच्या पत्रानंतर बंद आरोपांवर नगरसचिव अनिल बिडवे यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. महापौरांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही सभांमध्ये काही नगरसेवकांकडून शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचे महापौरांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे महापालिकेसोबतच शहराची प्रतिमा मलिन होत असून नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याने सभा लाइव्ह बंद करण्याची सूचना करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. आमदारांच्या निधीतील कामांवरून नाराजी प्रभाग ११, १८, १५ मध्ये आ. साजिद खान यांच्या निधीतून प्रस्तावित कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषयही चर्चेला आला. यावर चर्चा न करता प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुनील मेश्राम यांनी केली. आमदार निधीतून केवळ काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागात कामे केली जात असतील तर हा प्रकार योग्य नाहीॽ, असे ते म्हणाले. त्यामुळे या प्रस्तावावर चर्चा करण्याची आवश्यकता नसून तो मंजूर करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Source link
राजकारण:मनपा सभेचे लाइव्ह प्रक्षेपण बंद; विरोधकांचा पायऱ्यांवर ‘ठिय्या’