![]()
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस दलातर्फे ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीची सुरुवात पोलिस अधीक्षक कार्यालयातून झाली. या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभक्तीपर गीते व ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सहभागींच्या हातात तिरंगा ध्वज होता. रॅलीत नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. रॅलीचा मार्ग लक्झरी बसस्टँड, शासकीय बगिचा, महाराणा प्रताप चौक सिटी कोतवाली, बियाणी चौक, अकोट स्टँड चौक, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, नेकलेस रोड, सिव्हील लाईन चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, गौरक्षण रोड, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, जेल चौक असा होता. पोलिस अधीक्षक कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.
Source link
अकोला:तिरंगा मोटरसायकल रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद