Headlines

सांगोला महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून रास्ता रोकोचा इशारा:माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील थेट कार्यालयात धडकले‎




सांगोला शहर आणि तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सध्या खरिपाच्या पेरण्या लांबणीवर चालल्या आहेत. भूजल पातळी खालावल्याने तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने तालुक्यात शेतकरी आणि पशुपालकांना भारनियमनाचा धक्का दिल्याने सोमवार दि. १५ जून रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील चांगलेच आक्रमक झाले. वाढत्या भारनियमनाविरोधात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन थेट महावितरणच्या कार्यालयात धडक दिली आणि याबाबत संबंधित प्रशासनाला जाब विचारला. भारनियमनाच्या वेळेत बदल न केल्यास आणि वीज वितरण कंपनीच्या अन्य तक्रारी बाबत प्रशासनाने वेळेत दुरुस्ती केली नाही तर यापुढील काळात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकून पुढे रस्ता रोको सारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. यावेळी सभापती पूनम इंगवले, तहसीलदार बाळूताई भागवत, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जून महिना अर्ध्यावर आला तरी सांगोला तालुक्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यातच सांगोला तालुक्यात वीज वितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केल्याने शेतातील पिके जळून चालली आहेत तसेच जनावरांच्या चाऱ्याचा चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. सांगोला येऊन येथील शेतकरी आणि दिपकआबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेणार आहेत. जनावरांचे दूध काढण्यासाठी असणाऱ्या मशीन चालण्यासाठीही ऐन धारा काढण्याच्या वेळीच वीज नसल्याने पशुपाल शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे. याबाबत नुकतीच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात एक आढावा बैठक घेतली होती या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवार दि १५ जून रोजी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाळूताई भागवत आणि सांगोला येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बनसोडे यांना दिले. कार्यकारी अभियंता जाणून घेणार सांगोल्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह धडकले. यावेळी दिपकआबांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता साळवे यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता साळवे यांनी सांगोला येऊन येथील शेतकरी आणि दिपकआबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *