Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:सैदापूरमध्ये घरासमोरच कुटुंबावर हल्ला; कोयत्याच्या वाराने दोघे जखमी; तर उधारीवर सिगारेट न दिल्याने दुकानात धिंगाणा




जुन्या भांडणाचा राग मनात धरून सैदापूर येथे एका कुटुंबाला घरासमोर गाठून मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून, कोयता व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. दि. २७ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयितांनी घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी महिला, तिचे पती, मुलगा व भावजय यांना मारहाण केली. महिलेला केसाला धरून फरफटत नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिच्या पतीच्या पायावर व ओठाजवळ, तर मुलाच्या छातीखाली कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. मंगळसूत्र व मोबाईलही काढून घेतल्याचे फिर्यादीने सांगितले. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. उधारीवर सिगारेट न दिल्याने दुकानात धिंगाणा; महिलेला मारहाण उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून सैदापूर येथील किराणा दुकानात गोंधळ घालत महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दि. २७ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घटना घडली. रमेश आवळे याने उधारीवर सिगारेट मागितली. पैसे देण्यास सांगितल्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ करून छातीला धरत दुकानाबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. यात तिचा ड्रेस फाटल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आलेल्या अन्य व्यक्तींनीही महिलेला मारहाण केली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या निनाद सुरगुडे याच्या हातावर स्टीलच्या रॉडने मारण्यात आले. झटापटीत महिलेचे मंगळसूत्र गहाळ झाले. आठ जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजेत जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; लायटरने पिस्तुलाचा धाक जुन्या भांडणाचा विषय काढून करंजे येथील रिक्षा गॅरेजच्या शेडमध्ये तरुणावर हल्ला करण्यात आला. पिस्तुलासारखा दिसणारा लायटर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दि. २७ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ऋतिक उर्फ बबल्या पंडित हा शेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी संशयितांनी त्याला व मित्र निहाल सपकाळ यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरज उंबरकर याने पिस्तुलासारखे दिसणारे लायटर दाखवून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. किराणा दुकानात पैशांवरून वाद; मालकावर कोयत्याने वार किराणा साहित्याचे पैसे न देता निघून जाण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्याने मल्हार पेठेत दुकानमालकावर हल्ला करण्यात आला. या घटनेत दुकानमालकासह अन्य दोघे जखमी झाले. दि. २७ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. साहित्याचे पैसे न देता जाणाऱ्या व्यक्तींना दुकानमालकाने अडविले. त्यावेळी एका आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन करून तिची ओढणी ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर जालिंदर साठे याने दुकानमालकाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. शुभम साठे याने दांडक्याने हातावर मारहाण केली. अनिकेत माने याने दगडाने दुकानमालकाच्या पुतण्याला दुखापत केली. महिलेलाही काठीने मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. क्रूझच्या नोकरीच्या आमिषाने तिघांची ९.५२ लाखांची फसवणूक परदेशातील रॉयल कॅरिबियन क्रूझवर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तिघांकडून ९ लाख ५२ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावता टाळाटाळ केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आदित्य पवार याला क्रूझच्या किचन तसेच फूड अँड बेव्हरेज विभागात नोकरी देण्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडून पैसे घेतल्यानंतर ओंकार गायकवाड व विनय वरे यांच्याकडूनही प्रत्येकी ३ लाख १५ हजार रुपये घेतल्याचे नमूद आहे. नोकरीच्या प्रक्रियेसाठी उत्तर प्रदेश येथे संबंधितांकडून एसटीसीडब्ल्यू कोर्सही करून घेण्यात आला. पोवई नाका येथील कार्यालयात व्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ओम जाधव याच्यावर गुन्हा दाखल आहे. महामार्गावर निष्काळजीपणे उभ्या एक्सलला दुचाकी धडकली महामार्गावर पार्किंग लाईट व रिफ्लेक्टरविना उभ्या असलेल्या पुलर एक्सलला दुचाकी धडकल्याने युवक गंभीर जखमी झाला. सातारा गावच्या हद्दीत दि. २८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. शिवराज तिकाटणे येथील पुलावर मंगेश स्क्रॅप दुकानासमोर पुलर एक्सल उभा होता. त्याचवेळी श्रेयस चव्हाण दुचाकीवरून जात असताना त्याची मोटारसायकल एक्सलच्या मागील बाजूस धडकली. या अपघातात श्रेयसच्या दोन्ही हातांना आणि उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. वाहनावर आवश्यक सुरक्षा दिवे व रिफ्लेक्टर नसल्याने अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संतोष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चालक लालमन यादव याच्याविरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपशिंगेतून ११ लाखांची पिकअप चोरीला; सीसीटीव्हीवरून शोध अपशिंगे येथील विनोद कॉलनी परिसरातून सुमारे ११ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाहनमालकाच्या तक्रारीवरून बोरगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अनिकेत नलवडे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप (एमएच ११ डीडी ६५९३) परिसरात उभी होती. दि. २१ रोजी पहाटे साडेचार ते दि. २२ रोजी दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने वाहन लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे ११ लाख रुपये आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांकडून चोरट्याचा माग काढला जात आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *