Headlines

'सावरकरांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न':राहुल गांधींविरोधात सात्यकी सावरकरांनी ठोकला मानहानीचा दावा, कॉंग्रेसवरही केली टीका




काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांना ‘माफीवीर’ संबोधून त्यांच्यावर टीका केली होती, तसेच 2023 मध्ये ब्रिटनमध्ये केलेल्या एका भाषणातही त्यांनी सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विधानांची गंभीर दखल घेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात 2023 मध्येच कायदेशीर कारवाई करत मानहानीचा खटला दाखल केला असल्याची माहिती स्वतः सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले, 2023 मध्ये मी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला आहे. कारण मार्च 2023 मध्ये राहुल गांधी ब्रिटनमध्ये होते, त्यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी एक प्रसंग सांगितला होता. त्यात ते म्हणाले होते की वीर सावरकर आणि त्यांचे काही मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते. हे पाहून वीर सावरकर यांना आनंद होत होता. हा उल्लेख सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. वीर सावरकर यांनी असे कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. कॉंग्रेसने कायम शरणागतीच पत्करली पुढे बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले, वीर सावरकर मुस्लिम समुदायाचा तिरस्कार करणारे किंवा मॉब लिंचर होते अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे मी हा खटला 2023 मध्ये दाखल केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लांगूलचालनचे म्हणाल तर कॉंग्रेसची नीती ही स्वातंत्र्य संग्रामातही लांगूलचालनाचीच होती. कारण मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगने वंदे मातरम अर्धवट करण्याची मागणी केली होती आणि ती कॉंग्रेसने मान्य केली होती. शाह बानो प्रकरण असो किंवा इतर प्रकरण असोत कॉंग्रेसने कायम शरणागतीच पत्करली आहे. वीर सावरकरांचे हे म्हणणे होते की देशात म्हणजेच आपल्या मातीत जो माणूस जन्माला आला आहे, त्याच्यासाठी कुठलेही कम्युनल अवॉर्ड नको. तो आपल्या स्वमताने स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होईल, असेही त्यांनी म्हटले असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले. सावरकरांचे नाव घेऊन मुस्लिमांना शिव्या देऊ नये- मेहबूब शेख दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चला एक गोष्ट चांगली झाली की राहुल गांधी यांच्यामुळे सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांना म्हणावे लागले की वीर सावरकर यांनी मुस्लिम लीगचा तिरस्कार केला नाही. आता माझे म्हणणे आहे की जे वीर सावरकरांच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत असे सांगतात त्यांनी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे ऐकून तसे वागले पाहिजे. मुस्लिम समुदायला शिव्या देण्याचे काम त्यांनी करू नये. वीर सावरकर यांना जे मानतात त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन मुस्लिमांना शिव्या देऊ नये, नावं ठेऊ नये, असे आवाहन शेख यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *