Headlines

सिव्हिल हडकोत ‘कॅमेऱ्याची नजर’, ‘उपरोधिक टोमणे’ही ठरताहेत व्यर्थ:सूचना फलकाखालीच कचऱ्याचा ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात



शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सावेडी उपनगरातील उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या सिव्हिल हडको परिसरात कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासन एकीकडे स्वच्छता मोहिमेचे दावे करत असताना, दुसरीकडे नागरिक स्वतःच आरोग्याशी

.

सिव्हिल हडकोतील रहिवासी वस्तीमध्ये एका मोकळ्या जागेवर ‘येथे कचरा टाकू नये’ असा स्पष्ट सूचनाफलक लावण्यात आला आहे. परिसरात ‘सीसीटीव्ही यंत्रणा’ बसवण्यात आली असून कचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा इशाराही देण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, कचरा टाकणाऱ्यांची मानसिकता बदलावी म्हणून उपरोधिक भाषेत ‘गाढवासारखे वागू नये’ असा सज्जड दम देणारे फलकही लावले गेले.

मात्र, या सर्व सूचना आणि टोमण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत काही बेजबाबदार नागरिक अगदी त्याच फलकाखाली आणि कॅमेऱ्यासमोर आणून रोज कचरा फेकत आहेत. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. मोकाट कुत्रे आणि जनावरांचा वावर वाढल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले असून, नागरिक या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.

प्रशासकीय दिरंगाई आणि नागरिकांची नागरी जाणीवांची कमतरता यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे. केवळ सूचनाफलक लावून ही समस्या सुटणारी नसून महापालिकेने त्वरित दंडात्मक कारवाई करावी आणि कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत जागीच दंडाची तरतूद घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे हा दंडनीय अपराध आहे. या नियमांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था कचरा टाकणाऱ्यांवर ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत ‘स्पॉट फाइन’ (जागीच दंड) आकारण्याची तरतूद आहे. तसेच वारंवार उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडासह कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *