![]()
श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी श्रीगणेशाला समर्पित असून, यंदा २०२६ मध्ये ही संकष्टी चतुर्थी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ तसेच विशेष योगायोगावर आलेली आहे. यामुळे या सोमवारी शिवालय व श्री गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ही हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी महादेवाला बिल्वपत्र व श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करणे हितावह आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील “संकष्टी” म्हणजे संकटांचा नाश करणारी. ही भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र व फलदायी मानली जाते. श्रीगणेश हे हिंदू धर्मातील सर्वप्रथम पूजले जाणारे विघ्नहर्ता देवता मानले जातात. यामुळे भक्तांसाठी विशेष धार्मिक पर्वणी असणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी चंद्रोदय रात्री ८.३० वाजता होईल. या व्रतामध्ये रात्री चंद्रोदयाची वाट पाहिल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन बाप्पाचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. आशीर्वाद प्राप्त करता येणार ^तिसऱ्या सोमवारी शिवमुठ मूग आहे. यावर्षी महादेवाचे व श्रीगणेशाचे आशीर्वाद प्राप्त करता येतील. चंद्रोदय झाल्यानंतर सोमवारचा उपवास सोडला तरी चालेल. म्हणजेच दोन्ही व्रतांचे पूर्णत्व होईल. – पं. डॉ. संजय शहाकार, ज्योतिष अभ्यासक.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:श्रावण सोमवारी जुळून आला संकष्टीचा दुर्मिळ योग, पिता-पुत्राच्या पूजेसाठी उसळणार मंदिरांत गर्दी