![]()
आयडी अर्थात मंजुरी (डिजिटल अनुमती) देण्याचे अधिकार शासनाने गोठवल्यामुळे महानगर पालिकेत सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे १० हजारावर अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी मनपाने कालबद्ध कार्यक्रम आखला असून सर्वप्रथम प्रलंबित अर्जांचे अतिरिक्त मनुष्यबळ वापरून विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ४५०० अर्ज मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात मंजूर केले जातील, ज्या २ हजार अर्जांमध्ये बदल करायचा आहे. असे २०१६ च्या आधीचे अर्ज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवले जातील तर कागदपत्रांच्या अभावी ३५०० अर्ज रद्द करण्यात आले आहेत. जन्म-मृत्यूचे अर्ज निकाली काढण्याची अंतिम मुदत ठरवली असून दिवसाला २०० व्यक्तींना मनपातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. निबंधक डॉ. प्रतिभा आत्राम यांच्याकडे इतर कोणतेही काम न देता त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घ्यायची, असे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निबंधक डॉ. विशाल काळे यांना मनपा आयुक्तांनी दिले आहेत. ३५०० अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आले आहेत. याचा अर्थ ते पुन्हा तयार होणार नाहीत, असे नाही. तर मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाच्या निर्देशांनुसार कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करून नव्याने अर्ज करता येईल. मात्र, ज्यांच्याकडे जुने दाखलेच नाहीत. किंवा जन्म कुठे झाला, कधी झाला. कोणाचा जन्म घरीच झाला असेल तर अशा स्थितीत कागदपत्रे नसतील तर प्रमाणपत्र देता येत नाही. अशांना अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. न्यायालयाच्या निर्देशांनुसार तहसीलदार व मनपा कारवाई करून दाखले देतील. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व अर्ज निकाली काढणार गेल्या जानेवारी महिन्यापासून मोठ्या प्रमाणात जन्म-मृत्यूचे दाखले प्रलंबित आहे. यामुळे शहरवासीयांची चांगलीच गैरसोय होत असून विविध उपाययोजना करून ते एका महिन्यांत अर्थात ३० सप्टेबरपर्यंत निकाली काढले जाणार आहे. त्यानंतर केवळ नियमित अर्जांवर काम करावे, असे कडक निर्देश मनपा आयुक्तांकडून मनपाच्या आरोग्य विभागाला देण्यात आले. डॉ. मंगेश गोंदावले, आयुक्त अर्जांवर काम केले जाईल Q. दाखल्यांसाठी आलेले एकूण किती अर्ज प्रलंबित आहेत? A. १० हजार अर्ज प्रलंबित असून त्यामुळे विभागावर ताण वाढला. Q. ते निकाली काढण्यासाठी काही योजना तयार केली काय? A. होय, कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार एका महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व अर्ज निकाली काढले जातील. Q. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ कामी लावले काय? A. होय, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात अर्ज निकाली काढणे शक्य नाही. Q. अर्ज वेगाने निकाली काढण्यासाठी काय केले जाणार आहे? A. सर्व अर्जांचे विश्लेषण करून त्यांची जन्म, मृत्यू, बदल, प्रलंबित अशी श्रेणी ठरवण्यात आली आहे. ६५०० अर्ज मंजुरीसाठी ३० दिवसांची मुदत ३० दिवसांत मनपाचा आरोग्य विभाग ६५०० अर्ज निकाली काढणार आहे. यासाठी विशेष कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला असून मनपात दिवसाला ठरवलेल्या मर्यादेत अर्ज निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे अर्ज मंजूर होतील त्यांची नावे फलकावर लावली जाणार आहेत. ७०० अर्ज काही दिवसांआधी मृत्यू झालेल्यांचे आहेत, ते प्राधान्याने निकाली काढले जातील, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मनपा रोज देणार 200 जन्म-मृत्यू दाखले; १० हजार प्रलंबित अर्जांवर ॲक्शन प्लॅन