Headlines

हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे‎



वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य

.

या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाल्यास प्रवाशांना सावली मिळण्याबरोबरच परिसरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच रस्त्याच्या सौंदर्यातही भर पडून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. पिंपळ, वड आणि कडूनिंबाची झाडे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त मानली जातात. वृक्षलागवडीमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, मृदा व जलसंवर्धनास तसेच जैवविविधतेच्या जतनासही मदत होते. त्यामुळे केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधित विभागाने निश्चित करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यांच्यामते सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर विशेष वृक्षारोपण मोहीम राबवून पिंपळ, वड आणि निंबाच्या रोपांची लागवड करणे क्रमप्राप्त आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *