![]()
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी फोडण्यासाठीआणि पहिल्या उचलीचा तिढा सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरीसंघटना आता थेट रस्त्यावर उतरून आरपारच्या लढाईला सज्ज झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तब्बल एक लाख शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेपर्यंत कारखानदारांनी दर जाहीरन केल्यास, थेट नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून कामकाज रोखण्याचा व ठिय्या मारण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे अर्थकारण ज्या ऊसपिकावर अवलंबून आहे, त्या प्रश्नावर जिल्ह्यातील एकाही आमदार-खासदाराने अवाक्षरही नकाढल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे. असा असेल मोर्चाचा मार्ग सकाळी ११ वाजता चार पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होईल. मार्ग : चार पुतळा – पार्क चौक – पूनमगेट मार्गे हा मोर्चा मार्गक्रमण करेल. पुढची दिशा: पूनम गेटपर्यंत पोहोचल्यावरही जर दराची अधिकृतघोषणा झाली नाही, तर हा मोर्चा थेट नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तिथेच ठिय्या होईल. दर जाहीर होण्याअगोदर निम्म्यावर गाळप विठ्ठल ८५ तास बंद पाडला : आ. पाटील माढा । विठ्ठल कारखान्याला टार्गेट करून ८५ तासकारखाना बंद पाडला. कारखानदार-जिल्हाधिका री आणिआंदोलकांमधील बैठकीतून नक्कीच तोडगा निघेल. मीजाहीर केलेला ३५०० रुपये ऊस दर कारखाना अडचणीतअसताना सुध्दा शेतकऱ्यांना देणार आहे. मात्र ज्यांनीनिवडणुकीत एक रुपया आगाऊ दर देण्याची घोषणा केली.त्यांनी ती पूर्ण करावी. मी विधानसभेला ऊस दराचा दिलेलाशब्द पूर्ण करणार, असे आमदार अभिजित पाटील म्हणाले. मोहोळ तालुक्यात साडेचार लाख टन गाळप पापरी । ऊस दराची कोंडी फुटलेली नसतानाही मोहोळतालुक्यात चालू गाळप हंगामात ३ साखर कारखान्याच्यामाध्यमातून आज अखेर साडेचार लाखाहून मेट्रिक टन उसाचेगाळप झाले आहे. ऊस उत्पादकांना दराबाबत उत्सुकता लागलीअसून,टनाला किमान ४२०० रुपये दर मिळण्याची अपेक्षा तेव्यक्त करू लागले आहेत. तालुक्यातील भीमा सहकारी,लोकनेते शुगर, जकराया शुगर आणि आष्टी साखर कारखान्यांचेगाळप सुरू आहे. उसाला प्रतिटन ६,५०० रुपये हमीभाव द्या : किसान सभा बार्शी: राज्यातील ऊस उत्पादकशेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारितप्रतिटन ६,५०० रुपये हमीभाव मिळावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसानसभेने केली आहे. या मागणीसाठी येत्यादि. २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानावर सत्याग्रह आंदोलनकरण्यात येणार अाहे. या आंदोलनातजिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीसहभागी व्हावे, असे आवाहन किसानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
तमिळनाडू राज्य सरकारने उसालाप्रतिटन ४,२५० रुपये दर जाहीर केलाअसल्याचेही किसान सभेने निदर्शनासआणून दिले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील काहीसाखर कारखाने ऊस उत्पादकांना प्रतिटन४,२०० रुपयांपर्यंत दर देत आहेत. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या ६,५००रुपये प्रतिटन हमीभावाच्या मागणीलापाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्षकॉ. लक्ष्मण घाडगे, अनिरुद्ध नकाते,काका मुळे, तानाजी जगदाळे,बाळासाहेब जगदाळे आदी उपस्थित होते. ————– हेही वाचा.. पंढरपुरातील विहीर दुर्घटना: 50 फूट खोल विहीर ढासळून 4 मजूर ढिगाऱ्याखाली दबले; दोघांचे मृतदेह हाती, बचावकार्य सुरू
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा भराव ढासळून चार मजूर ५० फूट खोल विहिरीत दबले गेल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात घडली आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मजुरांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित दोन मजुरांचा शोध घेण्यासाठी पुण्याहून आलेले ‘एनडीआरएफ’चे (NDRF) पथक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. सविस्तर वाचा
Source link
सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून एल्गार:एक लाख शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, राजू शेट्टी करणार नेतृत्व