![]()
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतःचे नाव आणि छायाचित्र ‘ट्रेडमार्क’ म्हणून नोंदवण्यासाठी केलेल्या अर्जावरून आता नवा राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मुद्द्यावरून चाकणकर यांच्यावर तीव्र टीका केली आहे. भांडवलशाहीच्या युगात आधीच स्त्रीचे वस्तूकरण होत असताना, एका स्त्रीने स्वतःचे शरीर, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व यांना वस्तू म्हणून नोंदवून घेण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असा घणाघात अंधारे यांनी केला आहे. नेमका आक्षेप कशावर? सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क अर्जातील एका पानाचा संदर्भ देत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या अर्जातील ‘गुड्स अँड सर्व्हिसेस डिटेल्स’ या रकान्यात चाकणकरांनी स्वतःचा फोटो आणि त्यासंदर्भातील तपशील नमूद केला आहे. या कृतीवर आक्षेप घेत अंधारे म्हणाल्या, “स्त्री ही हाडामांसाची जिवंत व्यक्ती आहे, ती कोणतीही वस्तू नाही. तिचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व किंवा अस्तित्व हे कधीही विक्री-खरेदी अथवा पेटंटचा विषय होऊ शकत नाही.” ‘अशा प्रकारचं वस्तूकरण केविलवाणे वाटतं’ चाकणकरांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत अंधारे पुढे म्हणाल्या, “आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी, एका स्त्रीने अशा प्रकारे स्वतःचे वस्तूकरण करून घेण्याचा प्रयत्न करणे हे मला केविलवाणे वाटते. याबद्दल मला खरोखरच त्यांची सहानुभूती वाटते.” ‘सौंदर्य टिकत नाही, व्यक्तिमत्त्व समृद्ध करा’ अंधारे यांनी चाकणकरांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. “चाकणकरांनी आपल्या सल्लागारांना बाजूला करून या निर्णयाचा नक्की फेरविचार करावा. कारण सौंदर्य हे फार काळ टिकत नाही; मात्र मृत्यूनंतरही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा कायम राहतो. त्यामुळे स्वतःच्या नावाचा किंवा फोटोचा ट्रेडमार्क करण्यापेक्षा स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत,असा टोलाही त्यांनी लगावला.
—————- हेही वाचा.. पंढरपुरातील विहीर दुर्घटना:50 फूट खोल विहीर ढासळून 4 मजूर ढिगाऱ्याखाली दबले; दोघांचे मृतदेह हाती, बचावकार्य सुरू
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक मातीचा भराव ढासळून चार मजूर ५० फूट खोल विहिरीत दबले गेल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात घडली आहे. रविवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मजुरांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित दोन मजुरांचा शोध घेण्यासाठी पुण्याहून आलेले ‘एनडीआरएफ’चे (NDRF) पथक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. सविस्तर वाचा
Source link
स्त्री म्हणजे हाडामांसाची व्यक्ती, वस्तू नाही!:रुपाली चाकणकरांच्या 'ट्रेडमार्क' नोंदणीवरून सुषमा अंधारेंचा घणाघात