![]()
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची साफसफाई वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त
.
आयुक्तांनी पाहणीची सुरुवात नागपुरी गेट परिसरातून केली. परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, सार्वजनिक ठिकाणे आणि नाल्यांची पाहणी करून साफसफाईची गुणवत्ता तपासली. पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी नाल्यांमधील गाळ व कचरा नियमितपणे काढण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीही प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यानंतर आयुक्तांनी नागपुरी गेट येथील महानगरपालिका शाळा क्र. ३ ला भेट देऊन शाळेच्या परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. शालेय परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. लालखडी रिंग रोड व लालखडी पुलाची पाहणी करताना रस्त्यांच्या दुतर्फा असलेली स्वच्छता, नाल्यांची स्थिती, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि अतिक्रमणाची परिस्थिती यांचा आढावा घेण्यात आला. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तातडीने हटविण्याचे तसेच रस्ते व पुलांच्या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्यानंतर झोन कार्यालय व भाजीबाजार परिसरात स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. बाजारपेठेत निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, स्वच्छ ठेवणे तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकला जाणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्वच्छता, नालेसफाई आणि अतिक्रमण निर्मूलनाबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या पाहणीद्वारे आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिला.
या पाहणीवेळी झोन सभापती खॉ. आसिया अंजुम वहिद, नगरसेवक सैय्यद राशद अली सै. शौकत अली, सादिक शाह, अहमद भाई, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज खान, विवेक देशमुख, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड, स्वास्थ्य निरीक्षक, कोणार्क कंपनीचे सुपरवायझर उपस्थित होते.