Headlines

हिंगोली-औंढा मार्गावर हिवरा जाटू शिवारात दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू:रस्त्यावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत




हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवराजाटू शिवारात दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृ्त्यू झाल्याची घटना सोमवारी ता. २५ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील रहिवासी असलेला इंद्रजीत मारकड (२४) हा औंढा तालुक्यातील कुंडकर पिंपरी शिवारातील सौर उर्जा प्रकल्पावर कामावर आहे. नेहमी प्रमाणे इंद्रजीत हा सकाळी कामावर गेला होता. रात्रीच्या सुमारास काम आटोपून तो परत गावाकडे पिंपळा येथे दुचाकी वाहनाने निघाला होता. औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर हिवरा जाटू शिवारात त्याच्या दुचाकी वाहनाला अपघात झाला अन तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रवीकांत हरकाळ, सुरेश रणखांब, किशोर पारीसकर, विजय कालवे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी इंद्रजीत यास तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत इंद्रजीत याच्या मृतदेहावर मंगळवारी ता. २६ सकाळी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मयत इंद्रजीत याच्या पश्‍चात आई, भाऊ असा परिवार असल्याचे पोलिसांनी संगितले. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. या घटनेमुळे मारकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *