Headlines

हिंगोली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपात झिरो पेंडन्सी:13 हजार 713 अर्जांपैकी 13 हजार 707 मंजूर, 17 सप्टेंबरपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन




हिंगोली जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांची कार्यवाही गतिमान करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व 40 महसूल मंडळात ता 17 सप्टेंबर पर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रशासनाच्या गतिमान धोरणामुळे तेरा हजार 713 प्रस्तावंपैकी 13 हजार 707 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्ताव मंजुरीचे झिरो पेंडन्सी ठेवून हिंगोली जिल्हा अव्वल ठरला आहे. सध्या एकही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा 4 हजार 599 नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापूर्वी 8 जानेवारी 2024 रोजी गावनिहाय नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच 17 व 18 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. 10 सप्टेंबर 2025 रोजीही नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, 8 सप्टेंबर 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर नोंदी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या गावातील उपलब्ध नोंदी तपासता येणार असून, प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जात प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत प्राप्त 13 हजार 713 अर्जांपैकी 13 हजार 707 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांतील त्रुटींमुळे 6 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. 9 सप्टेंबर 2026 अखेर प्रमाणपत्रासाठी एकही अर्ज प्रलंबित नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हैदराबाद गॅझेटवर आधारित प्राप्त अर्जांवरही शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राप्त 80 अर्जांपैकी 76 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटपावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, वसमत चे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप झिरो पेंडन्सीत आहे. त्यानंतर ही प्रशासनाने 40 मंडळांमधून तारीख 17 सप्टेंबर पर्यंत विशेष शिबीरांचे आयोजन केले आहे या विशेष शिबिरांमध्ये जुन्या महसूल नोंदी व अन्य पुरावे शोधणे, प्राप्त अर्ज व कागदपत्रांची तातडीने पडताळणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी समन्वय साधून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यवाही करणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *