![]()
शाळेच्या डब्यात मुलांनी काय आणावे हे सांगणाऱ्या आणि कांदा-लसूण खाण्यावर बंदी घालणाऱ्या शाळांना सरकारने तात्काळ टाळे लावले पाहिजे. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे, तो शाळेच्या वेशीपर्यंत येता कामा नये. महाराष्ट्रातील जनतेने काय खायचे आणि काय नाही, हे ठरवणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता कोण आहेत? महाराष्ट्रात धर्माच्या नावावर अशी बंधने लादली जात असतील तर हे ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर आहे, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक ‘धर्मअभिमानी’ नेते आहेत, ते आता कुठे गेले आहेत? त्यांनी नरेंद्र मेहतांची मानगुट पकडली पाहिजे. स्वतःच्या पक्षाचा आमदार अशा शाळा चालवत असताना फडणवीस त्यांना कशी काय परवानगी देतात? रिक्षाचालकांच्या मुद्द्यावर सरनाईकांचे कौतुक संजय राऊत म्हणाले की, रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ काल मला भेटले, ते चर्चेनंतर पूर्णपणे समाधानी असल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले. मी पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री आणि आयुक्तांनी योग्य मार्ग काढला, ही बाब कौतुकास्पद आहे. मी दौऱ्यावर असल्याने मंत्र्यांकडे जाऊ शकलो नाही, मात्र पुढच्या वेळी नक्की जाईन, असे राऊत यांनी स्पष्ट केले. शिंदेंनी भवानी तलवार घेऊन यावे संजय राऊत म्हणाले की, संसदरत्न पुरस्कार हा काही शासकीय पुरस्कार नाही; संसदेत न बोलणाऱ्यांनाही ते मिळतात. लंडनमधील पुरस्काराबद्दल मला काही माहिती नाही, लंडनमध्ये केवळ हवापालट करायला लोक गेले असतील. शिंदे तिकडे गेलेच आहेत, तर त्यांनी येताना छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार परत घेऊन यावी. पवारांचा संशयास्पद मृत्यू हा वैयक्तिक विषय नाही संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला विसरण्याचा आजार झाला आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा विषय पुढे काढणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण हा विषय का काढायचा नाही? अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते होते, त्यांचा संशयास्पद मृत्यू होणे हा कोणाचा कौटुंबिक किंवा खासगी प्रश्न नाही. यावर विरोधकांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस:प्रकृती खालावल्याने काल घेतले सलाईन, राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सलग 13 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते. वाचा सविस्तर
Source link
डब्यात कांदा-लसूण नको म्हणणाऱ्या शाळांना टाळे लावा:धर्माच्या नावावर बंधने लादणे लव्ह जिहादपेक्षा भयंकर, खासदार संजय राऊतांचा भाजपवर घणाघात