![]()
पावसाने ओढ दिल्यामुळे अक्कलकोटमधील शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाअभावी नदीकाठावरील ऊस व इतर पिके वाळून जात होती अशात आता हिळ्ळी बंधारा पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. गेल्या महिन्यात वीज वितरण कंपनीकडून रोज केवळ दोन तासच वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे नदीकाठातील ऊस उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांनीही दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्ठीमुळे खरीप पिके हातची गेली होती. या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप बाजरी, मूग, उडीद आदी पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या खरीप पिके पूर्णत: गेल्यामुळे बळीराजांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने आता महावितरण विभागाने आठ तास विद्युत मोटारीसाठी वीज उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. हिळ्ळी बंधाऱ्याखाली हिळ्ळी, आंदेवाडी बु., आंदेवाडी खु. कुडल, देविकवठा, घुंगरेगाव, शावळ, तडवळ, खानापूर, पानमंगरुळ, म्हैसलगी आदी ११ गावांना लाभ होईल. सुमारे ४० ते ५० हजार हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येईल. करजगी, शावळ, पानमंगरूळ, कुडल गावांची तहानही भागेल.
Source link
हिळ्ळी बंधारा पाण्याखाली, नदीकाठी आठ तास वीज सुरू:नदीकाठच्या गावांना फायदा, खरीप पावसावरच