Headlines

20 संघांकडून नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण:चांदवड येथीन जैन तंत्रनिकेतनमध्ये ‘अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकाथॉन




येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनात ‘अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकाथॉन-२०२६’ पार पडली. या हॅकाथॉनमध्ये संस्थेच्या विविध विभागांतील एकूण २० संघांतील १२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. यावेळी तंत्रनिकेतनातील स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी तसेच यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आणि नावीन्यपूर्ण विचारांवर आधारित प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे यांनी नावीन्यपूर्ण आणि व्यावहारिक समस्या सोडवण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केलेले ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील समस्यांवर त्यांचे सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी एक गतिशील व्यासपीठ प्रदान करते. विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण विचार करण्यास प्रोत्साहित करून शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोग यांच्यातील अंतर कमी करणे हा या हॅकाथॉनचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तंत्रज्ञानातील नवीन संधी आणि नावीन्यपूर्ण विचारांचे महत्त्वही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पटवून दिले.विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे वेगळेपण, पॉवर पॉइंट सादरीकरण, सादरीकरण कौशल्य आणि टीमवर्क या निकषांवर आधारित प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. परीक्षक म्हणून ए. एस. चोरडिया, एस. एन. गोसावी, डॉ. पी. जी. आहेर, ए. एस. अजमेरे, के. के. काळे, एस. एम. बच्छाव, एल. एस. बैरागी यांनी काम पाहिले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *