Headlines

मनमाड पालिकेत वार्षिक लेख्यांवरून खडाजंगी:26 विषयांना मिळाली मंजुरी, ‘छत्रपती शिवाजी महाराज संकुल” नामकरणासह गाळे लिलावावर चर्चा‎



येथील नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत जुने वार्षिक लेखे वेळेवर न आणल्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र, लेख्यांना मंजुरी न मिळाल्यास शासनाकडून शहराला मिळणारे अनुदान व विकासनिधी

.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष कमल आंधळे उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, विरोधी पक्षनेते अमोल नरवडे तसेच नगरसेविका कमल सांगळे यांनी जुने लेखे विलंबाने सादर करण्यावर तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला जाब विचारला. त्यावर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी लेखे अनुकूल असल्याचे सांगत आवश्यक ती सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली. या सभेत प्रभाग क्रमांक सहामधील म्युनिसिपल ऑफिस शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचा पारदर्शक खुला लिलाव करण्यावर सविस्तर चर्चा होऊन, या संकुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल’ असे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय पालिका शाळांमध्ये विद्युतीकरण व आवश्यक सुविधा, विविध नागरी विकासकामे, अहिंसा स्मारकाची पालिका अभिलेखात नोंद आदी विषयांना मंजुरी मिळाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या ऐतिहासिक वास्तूचे ‘प्रेरणाभूमी’ म्हणून जतन-संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली असून, १७ नोव्हेंबरला पालिकेतर्फे ‘प्रेरणा दिन’ साजरा करण्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा गंभीर प्रश्नही या सर्वसाधारण सभेत गाजला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. यावर, संबंधित संस्थेची कायदेशीर व तांत्रिक कागदपत्र प्रक्रिया पूर्ण होताच शहरात मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम पुन्हा वेगाने सुरू केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *