भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू:लातूर-अंबाजोगाई मार्गावर दुर्घटना; तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात…