Headlines

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 581 मतदार निवडणार विधान परिषदेतील आमदार:1 जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार, 18 जून रोजी मतदान, 22 जूनला मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ५८१ मतदार आहेत, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी गुरुवारी (२१ मे) पत्रकार परिष . छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे १२५, जिल्हा परिषद ६३, पंचायत समिती ९ तर नगर पंचायत, नगर परिषद व छावणी परिषदेचे १६३…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

सातारा जिल्ह्यातही 'कॉक्रोच जनता पार्टी'ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित केले प्रश्न

देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील श्री धुळोबा मंदीरात आज पार पडलेल्या धुळदेव ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले. भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी…

Read More

गावदेवी मार्केटची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी:आगीतील जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा

ठाणे शहरातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षारक्षकाचा कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या दोन जखमी जवानांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येईल असेही शिंदे यांनी जाहीर केले. आज संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली….

Read More

राज्य पोलिस दलात प्रचंड फेरबदल:IPS आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या अन्‌ पदोन्नतीचे आदेश जारी; मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईत नव्या नियुक्त्या

राज्यातील प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. पोलिस स्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींनुसार, तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचे तंतोतंत पालन करून हे…

Read More

वाढदिवसाच्या बहाण्याने बालविवाहाचा घाट:हळदीचा कार्यक्रम सुरू असताना 16 वर्षीय मुलीची सुटका, रामटेक तालुक्यातील घटना

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घरात वाढदिवसाचा बहाणा करून हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच बाल संरक्षण पथकाने छापा टाकून मुलीची सुटका केली. बाल संरक्षण पथकाने सुरुवातीला मुलीच्या घरी भेट दिली असता ती तिथे नव्हती….

Read More

अमरावतीत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन:राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार क्रांती घडवली – काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देशमुख

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राजीव गांधी हे देशातील तंत्रज्ञान क्रांतीचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन केले. देशमुख म्हणाले की, राजीव गांधींनी देशात संगणक, दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने तंत्रज्ञान…

Read More

पंचायत विकास आराखडा ऑनलाईन प्रशिक्षणाला जि.प. विभागप्रमुखांची उपस्थिती:"सर्वांची योजना-सर्वांचा विकास" अंतर्गत नियोजन प्रक्रियेवर मार्गदर्शन

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात गुरुवारी “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रियेवर आधारित या कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले….

Read More

दर्यापूर एसटी आगारात आमदार लवटे यांची झाडाझडती:व्यवस्थापकावर अनियमिततेवरून प्रश्नांची सरबत्ती, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्या

आमदार गजानन लवटे यांनी गुरुवारी दर्यापूर येथील एसटी आगाराला अकस्मात भेट दिली. यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दर्यापूर डेपोचे व्यवस्थापक स्थानिक रहिवासी असल्याने कर्मचाऱ्यांशी हुकूमशाही पद्धतीने वागतात. ते स्वतःचा कार्यभाग चांगला ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करतात. रजा बिनपगारी मंजूर करणे, रजा प्रलंबित ठेवणे, दोन…

Read More

शेषराव खाडे यांच्या 'कृत्रिम प्रज्ञा' कादंबरीचे प्रकाशन:मान्यवरांकडून सकारात्मकता आणि मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून कौतुक

अमरावती येथे प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ या कादंबरीचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी कादंबरीचे कौतुक केले. ही कादंबरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकते, तसेच सकारात्मकता व मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडला. या…

Read More