नगर तालुक्यात जनगणनेचा श्रीगणेशा; शिक्षकांचे चहा-पाण्याने स्वागत:नेप्तीसह परिसरातील गावांमध्ये घरयादी व घरगणनेसाठी नागरिकांचा प्रतिसाद
भारतीय जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरयादी व घरगणना करण्याच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव आदी भागांत १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सध्या नेप्ती व परिसरामध्ये जनगणनेचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या…