Headlines

ग्राउंड रिपोर्ट:‘सूर्यास्त्र’च्या यशस्वी चाचणीनंतर शिर्डीतील डिफेन्स क्लस्टरचा आरंभ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार उद्या उद्घाटन




पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या फतेह-२ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला सडेतोड उत्तर देण्यासाठी विकसित भारतीय ‘सूर्यास्त्र’ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर निबे ऑर्डिनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड या खासगी उद्योग समूहाने शिर्डीत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारले आहे. वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करणारा हा देशातील सर्वात मोठा खासगी प्रकल्प ठरेल. त्यासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या ग्लोब फोर्ज या कंपनीने २०० एकरांवर उभारलेल्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सचे उद‌्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या (२३ मे) होणार आहे. संचालक गणेश निबे ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, ‘सूर्यास्त्र’च्या हार्डवेअरसह तोफगोळे, ड्रोन व लष्करासाठी सर्वाधिक स्वदेशी बनावटीची शस्त्रे येथे उत्पादित होतील. १५५ मिलिमीटर तोफांसाठी गोळ्यांच्या उत्पादनाची पहिली असेंब्ली लाइन असून त्यात तीन महिन्यांत ३ लाख तोफगोळ्यांची निर्मिती होईल. वर्षभरात ही क्षमता ५ लाखांपर्यंत वाढेल. त्यातून २ हजार रोजगारही निर्माण होतील. वार्षिक ५ लाख तोफगोळ्यांच्या विक्रमी निर्मितीचे लक्ष्य २००५ : कविता फॅब्रिक्सद्वारे गणेश निबेंची कारकीर्द सुरू.
२०१२ : निबे लिमिटेड म्हणून ब्रँडचे केले नामकरण.
२०२२ : गोवा शिपयार्डकडून नौदलाचे २५ कोटींचे कंत्राट
२०२४ : निबे ऑर्डिनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड म्हणून विस्तार.
२०२५ : भारतीय लष्करासह परदेशी कंपन्यांसोबत करार
२०२६ : जानेवारीत ‘सूर्यास्त्र’ क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी केंद्राचा इमर्जन्सी खरेदीचा करार आणि निर्मिती
२०२६ : जानेवारीत माजी संरक्षण सचिव रविकांत हे कार्यकारी संचालक नियुक्त
२०२६ : मेमध्ये शिर्डीत ग्लोब फोर्ज हे डिफेन्स कॉम्प्लेक्स
२०२६ : अहिल्यानगरमध्ये १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा
२०२६ : श्रीगोंद्यात सीएनजी प्रकल्प, धाराशिवमध्ये ९०० एकरवर दुसरा डिफेन्स प्लँट.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *