![]()
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथनिहाय कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभे करावे, पक्षाचा विस्तार करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार संपर्क अभियान राबवा. अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. शिवसंवाद दौऱ्यात खासदार शिंदे यांनी नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले तसेच काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आवश्यक संसाधने पुरविली जातील अशी ग्वाही दिली. त्यांनी नांदगाव आणि मनमाड येथील नगरसेवकांशीही स्वतंत्र चर्चा करत त्यांना जनतेचे प्रश्न आग्रक्रमाणे सोडविण्याच्या सूचना करत शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकाळात मतदार संघात शिवसेनेने कशा प्रकारे जोरदार मुसंडी मारत सर्व प्रमुख संस्थांवर भगवा फडकविला याची माहिती दिली. या कामात समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुम कांदे या आमदार सुहास कांदे यांच्या खांद्याला खांदा लावून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे त्या लोकाभिमुख आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार धनराज महाले आदी उपस्थित होते.
Source link
पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसैनिकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचावे:खासदार शिंदे यांच्या नांदगाव, येवला येथील पदाधिकाऱ्यांना सूचना